जान्हवी कपूरच्या लग्नाची चाहूल! बोनी कपूर यांनी ‘या’ मुलाला निवडलं जान्हवीसाठी!

[page_hero_excerpt]

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकतीच जान्हवीचे वडील आणि प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांनी मुलाखतीत जान्हवी आणि शिखर पहाडिया यांच्या नात्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

बोनी कपूर यांनी स्पष्ट केले की जान्हवी आणि शिखर पहाडिया हे रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांना दोघांनाही ते पसंत करतात. शिखरला ते जान्हवीच्या आधीपासून ओळखतात आणि त्यांची मैत्री चांगली आहे. बोनी कपूर यांनी असेही म्हटले की, जान्हवी आणि शिखर यांच्यात भांडणे झाली असली तरी ते पुन्हा एकत्र आले आहेत आणि त्यांचे नातं आयुष्यभरासाठी आहे. शिखर कधीच जान्हवीला सोडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याव्यतिरिक्त, बोनी कपूर यांनी खुलासा केला की शिखर आणि जान्हवी यांच्यामध्ये मैत्री आणि प्रेम दोन्ही आहे. शिखर कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत चांगले संबंध ठेवतो आणि त्याला सर्वांनी स्वीकारले आहे.

अलिकडेच जान्हवीने तिचा २७ वा वाढदिवस साजरा केला आणि तिरुमाला मंदिरात दर्शनासाठी शिखरसोबत गेली होती.

बोनी कपूर यांच्या या विधानामुळे जान्हवी आणि शिखर यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बोनी कपूर यांचा ‘मैदान’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

जान्हवी ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’, ‘मिस्टर अँड मिसेज माही’, ‘उलझन’, ‘आरसी 16’ आणि ‘देवारा: पार्ट 1’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.