Train मध्ये Baby Berth कसा बुक करायचा? काय आहेत रेल्वेचे नियम, जाणून घ्या-

[page_hero_excerpt]

Indian Railway (Train): ट्रेनमधून प्रवास करताना जर नवजात मूल तुमच्यासोबत असेल तर त्यामुळे प्रवासात खूप त्रास होतो. विशेषत: नवजात बालकांच्या मातांना त्यांना हाताळताना खूप अडचणी येतात. कारण ट्रेनची सीट एका व्यक्तीसाठी असते.

मात्र लहान मूल आईसोबतच झोपते, त्यामुळे मातांना प्रवासात खूप त्रास सहन करावा लागतो. या सर्व समस्या लक्षात घेऊन रेल्वेने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. नवजात बालकांच्या मातांच्या समस्या लक्षात घेऊन उत्तर रेल्वेने एक नवा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये नवजात मुलांसाठी एक्स्ट्रा बेबी बर्थ उपलब्ध आहे. उत्तर रेल्वेच्या या उपक्रमामुळे नवजात बालकांच्या मातांना दिलासा मिळणार आहे.

सध्या दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या ट्रेनच्या दोन बर्थवर ही सुविधा देण्यात आली आहे. लखनऊ ते नवी दिल्ली प्रवास करणाऱ्या लखनऊ मेलच्या (१२२२९-३०) एसी कोचमध्ये या प्रकारचा विशेष बर्थ जोडण्यात आला आहे. या ट्रेनच्या बी-4 कोचच्या दोन सीटमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा बर्थ उघडू शकता किंवा दुमडून ठेवू शकता.

कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही

रेल्वेच्या या नव्या उपक्रमामुळे नवजात बालकांच्या मातांना बरीच सोय होणार आहे. या प्रयत्नाचा प्रवाशांना फायदा झाला तर इतर ट्रेनमध्येही ही सुविधा दिली जाईल. रेल्वेच्या विशेष सुविधेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

ही सीट कशी बुक करायची?

या सीटवर नोंदणीसाठी, तुम्हाला 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी एक फॉर्म भरावा लागेल. सध्या ही सुविधा दिल्ली ते लखनौ दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. उत्तर रेल्वेच्या या नव्या उपक्रमामुळे नवजात बालकांना रेल्वेने प्रवास करणे सोपे होणार आहे.