RTO कडे ड्रायव्हिंग लायसन्स बनवायला आता नाही खावे लागणार धक्के, केंद्र सरकारने केले महत्वाचे बद्दल, जाणून घ्या

[page_hero_excerpt]

केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जून 2024 पासून तुम्ही प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO) तसेच तुमच्या जवळच्या खाजगी केंद्रात किंवा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकाल.

या केंद्रांना ड्रायव्हिंग चाचणी घेण्याची आणि ड्रायव्हिंग प्रमाणपत्र जारी करण्याची परवानगी दिली जाईल. या बदलामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे सोपे होणार आहे.

सध्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. त्यासाठी अधिक कागदपत्रेही लागतात. अनेक फॉर्म भरून अनेक कार्यालयांमध्ये जावे लागते. लांबलचक आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे परवाना आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे.

त्यामुळे संपूर्ण देशाच्या रस्ते सुरक्षेवर परिणाम होतो. त्यामुळे, या उणीवा दूर करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील सध्याच्या ड्रायव्हिंग नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत.

खाजगी केंद्रासाठी अटी व शर्ती:

ड्रायव्हिंग स्कूलकडे दुचाकी प्रशिक्षणासाठी किमान 1 एकर आणि चारचाकी प्रशिक्षणासाठी 2 एकर जागा असणे आवश्यक आहे. शाळेतच ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची योग्य व्यवस्था असावी. शाळेत ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणारा ट्रेनर किमान हायस्कूल पास असावा आणि त्याला 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.

कमी कागदपत्रे करावी लागणार:

आता परवाना काढण्यासाठी कमी कागदपत्रे करावी लागणार आहेत. अर्जदाराला फक्त तीच आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील, जी परवान्याच्या प्रकारानुसार विहित केली जातील. परिवहन विभाग अर्जदाराला कोणती कागदपत्रे द्यायची आहेत हे आधीच सांगेल.

ऑनलाइन अर्ज कसा करावा:

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज प्रक्रिया तशीच राहील. परवान्यासाठी अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन केला जाऊ शकतो. अर्जदार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात – https://parivahan.gov.in/. तथापि, अर्ज सादर करण्यासाठी संबंधित आरटीओला देखील भेट देता येईल.

Driving License Rules 2024: 1 जूनपासून ड्रायव्हिंगचे नियम बदलतील, चूक झाल्यास 25000 रुपये दंड आकारला जाईल

परवाना नसताना अल्पवयीन वाहन चालवल्यास २५ हजार रुपये दंड

किंवा अतिवेगाने वाहन चालवल्यास मोठा दंड आकारण्याची तरतूद आहे. सध्या यासाठी एक ते दोन हजार रुपये दंड आहे. त्याचबरोबर अल्पवयीन वाहन चालवताना पकडले गेल्यास पालकांवर कारवाई करण्यात येणार असून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. वाहन नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते आणि 25 वर्षे वयापर्यंत अल्पवयीन व्यक्ती परवान्यासाठी अपात्र ठरेल.