Fact Check: राम मंदिराच्या नावावर फ्री रिचार्ज देणाऱ्या लिंक चे सत्य जाणून घ्या

Fact Check: अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीच्या अभिषेक करण्यापूर्वी अनेक प्रकारचे खोटे आणि दिशाभूल करणारे दावे व्हायरल होत आहेत. आता फ्री रिचार्जशी संबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे.

असा दावा केला जात आहे की, राम मंदिराच्या स्थापनेचा उत्सव साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीएम योगी संपूर्ण भारताला 3 महिन्यांचे फ्री रिचार्ज देत आहेत. पोस्टमध्ये एक लिंकही शेअर केली जात आहे.

विश्‍वास न्यूजने केलेल्या पडताळणीत राम मंदिर उभारणीच्या निमित्ताने ग्राहकांना मोफत रिचार्ज देण्याचा दावा चुकीचा आहे. व्हायरल लिंक ही फिशिंग लिंक आहे, ज्यामुळे ग्राहक फसवणुकीला बळी पडू शकतात असे सांगितले आहे.

महत्वाची बातमी:  नवे सरकार स्थापन होताच RBI देणार गिफ्ट! घर किंवा कार खरेदी करा, सर्वत्र पैशांची होईल बचत, येऊ शकते चांगली बातमी

व्हायरल झालेल्या मेसेज मध्ये “राम मंदिर ऑफर: 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या स्थापनेच्या निमित्ताने मोदी आणि योगी लोकांना मोफत भेट देत आहेत.” असे लिहले आहे आणि त्यासोबत एक लिंक दिलेली आहे ज्यावर क्लिक करण्यास सांगितले आहे.

Fact Check करणारी वेबसाईट विश्‍वास न्यूजने त्यांच्या आर्टिकल मध्ये लिहिले आहे कि जेव्हा त्यांनी व्हायरल पोस्टची चौकशी करण्यासाठी, प्रथम संबंधित कीवर्डसह Google शोधले. आम्हाला दाव्याशी संबंधित कोणतीही माहिती सापडली नाही. तपास पुढे नेत आम्ही भाजपचे सत्यापित सोशल मीडिया हँडल शोधले . आम्हाला दाव्याची पुष्टी करणारी कोणतीही पोस्ट सापडली नाही .

महत्वाची बातमी:  Indian Railway Rules: ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमचे सामान हरवले किंवा चोरीला गेले तर तुम्ही काय करावे? जाणून घ्या

तपास पुढे नेत, आम्ही दाव्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर देखील शोध घेतला . तिथेही आम्हाला अशी कोणतीही माहिती मिळाली नाही.

जर आपण व्हायरल लिंकची URL काळजीपूर्वक पाहिली तर ते जिओ किंवा भारत सरकारशी संबंधित नाही हे समजू शकते.

निष्कर्ष: विश्‍वास न्यूजला त्यांच्या तपासात आढळून आले की राम मंदिराच्या नावाने व्हायरल झालेली लिंक ही फिशिंग लिंक आहे. राम मंदिर उभारणीच्या निमित्ताने ग्राहकांना मोफत रिचार्ज देण्याचा दावा चुकीचा आहे. लिंकवर क्लिक करून ग्राहक फसवणुकीला बळी पडू शकतात.

महत्वाची बातमी:  राज्यभरातील पेट्रोल पंप बाहेर मोठ्या रांगा… नवीन मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप